कुंडलिकेच्या पात्रात सापडला मृतदेह

। गोवे- कोलाड । वार्ताहर ।
मुबंई-गोवा हायवेवरील कोलाड जवळील कुंडलिका नदीपात्रात एका अज्ञात इसमाचा मृतदेह सापडल्याने या घटनेबाबत कोलाड परिसरात एकच खळबळ माजली आहे . सोमवारी सायंकाळी 6.50 वा कुंडलिका नदीपात्रातील पुलाखालील पहिल्या गाळ्यात कातळावर हे अनोळखी प्रेत आढळून आले. हे प्रेत पुरूष जातीचे असून त्याचे वय अंदाजे 45 ते 50 आहे. त्याचा चेहरा संपूर्ण काळा पडलेल्या व सडलेल्या अवस्थेत आहे.प पोलीस हवालदार जे.एस.चेरकर अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version