| पनवेल | वार्ताहर |
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पुणे लेनवर रस्ता पार करणाऱ्या एका 40 ते 45 वर्षीय व्यक्तीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात पादचारी गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील मृत व्यक्तीची ओळख पटलेली नसून त्याला पनवेल उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आले. याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.