नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
देशात कोरोनाच्या दुसर्या लाटेचा कहर सध्या सुरुच आहे. नव्या बाधितांची, मृतांची संख्या जरी कमी होत असली तरी अजूनही रुग्णवाढ होत आहेच. गेल्या 24 तासांत 60हजार 753 नव्या बाधितांची नोंद झाली. त्यामुळे देशातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या आता सात लाख 60 हजार 19 वर पोहोचली आहे. तर गेल्या 24 तासांमध्ये देशातले 97 हजार 743 रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या दोन कोटी 86 लाख 78 हजार 390 वर पोहोचली आहे.
24 तासांत 1,647 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे आत्तापर्यंतचा करोनामृत्यूंचा आकडा आता तीन लाख 85 हजार 137 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासात 33 लाख 85 नागरिकांनी करोना प्रतिबंधक लस घेतली. त्यापैकी 29 लाख 13 हजार 219 जणांनी पहिला डोस घेतला. तर दुसरा डोस घेणार्यांची संख्या तीन लाख 86 हजार 866 इतकी आहे. त्यामुळे लस घेतलेल्या नागरिकांची एकूण संख्या आता 27 कोटी 23 लाख 88 हजार 783 वर पोहोचली आहे.