गतविजेते विश्वचषकातून जवळपास बाहेर

श्रीलंकेचा इंग्लंडवर दणदणीत विजय

| मुंबई | वृत्तसंस्था |

श्रीलंकेकडून आठ विकेट्सनी दारूण पराभव झाल्यानंतर इंग्लंड विश्वचषक 2023 मधून जवळपास बाहेर पडली आहे. गतविजेत्या इंग्लिश संघासाठी विश्वचषक 2023 खूपच वाईट ठरला आहे. इंग्लंड संघाने आतापर्यंत तीन सामने खेळले होते, त्यातील दुसरा सामना सोडला, तर इंग्लंडने उर्वरित तीन सामन्यात पराभव पत्करला आहे. अशात त्यांना श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातही गुरुवारी (दि.26) बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. या सामन्यात त्यांच्या फलंदाजांनी अतिशय संघाला लाजवेल अशी फलंदाजी केली. संघाचा डाव अवघ्या 156 धावांवर आटोपला. प्रत्युतरात लंकेने आठ गड्यांच्या मोबदल्यात हे लक्ष्य पार केले.

या विश्वचषकातील पाच सामन्यांमधला इंग्लंडचा हा चौथा पराभव आहे. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 156 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने दोन गडी गमावून 25.4 षटकात 160 धावा केल्या आणि सामना आठ गडी राखून जिंकला. 2007 पासून इंग्लंडने श्रीलंकेला विश्वचषकात पराभूत केलेले नाही. श्रीलंकेच्या लाहिरू कुमाराला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्याने एकूण तीन विकेट्स घेतला. कुसल मेंडिस आणि परेरा हे लवकर बाद झाले. त्यांनी अनुक्रमे 4 आणि 11 धावा केल्या. पाथुम निसांकाने 54 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने पुन्हा एकदा उत्कृष्ट खेळी केली आहे. त्याच्या या शानदार खेळीमुळे श्रीलंकेने दमदार विजय नोंदवला.

Exit mobile version