कुरुळचा विकास शेकापक्षामुळेच-आस्वाद पाटील

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
आतापर्यंत कुरुळ ग्रामपंचायतीच्या परिसरामध्ये करण्यात आलेली विकास कामे ही शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातूनच करण्यात आली आहेत. पाणी पुरवठा योजना देखील आपण मंजुर केली आहे. त्याचे श्रेय लाटण्याचे प्रयत्न कोणी करीत असेल तर ते चुकीचे आहे. असे फुकटचे श्रेय कोणी घेण्याचा प्रयत्न करुन नका असा इशारा शेकापक्षाचे जिल्हा चिटणीस जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य अ‍ॅड आस्वाद पाटील यांनी दिली. कुरुळमध्ये बापदेव समाजमंदिरा समोरील शेडचे लोकार्पण आणि चिदबादेवी मंदिराच्या परिसर सुशोभीकरण कामाचा भूमिपूजन कार्यक्रम शेकापक्षाचे जिल्हा चिटणीस जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य अ‍ॅड आस्वाद पाटील यांच्या हस्ते आणि जिल्हा परिषद सदस्या सौ प्रियदर्शनी संजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पार पडले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य द्वारकानाथ नाईक, संजय पाटील, माजी सरकारी वकील अ‍ॅड प्रसाद पाटील, अलिबाग पंचायत सभापती प्रमोद ठाकूर, माजी उपसभापती सुरेश पाटील, उपसरपंच स्वाती पाटील, अ‍ॅड सतिश नाईक, माजी सरपंच प्रकाश पाटील, अनिल पाटील, मनोज ओव्हाळ आदी उपस्थित होते. सर्वात आधी बापदेव समाजमंदिर समोरील शेडचे लोकार्पण करण्यात आला नंतर चिदबादेवी मंदिर जवळ नारळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात झाला. यावेळी ते बोलत होते.

आपल्या मनोगतात अ‍ॅड आस्वाद पाटील यांनी चिदबा देवी मंदिाराच्या सुशोभिकरणासाठी निधी कमी पडला तरी उपलब्ध करुन देऊ. अशी ग्वाही देताना मंदिराच्या भोवतालच्या भिंतीचे काम करण्याच्या सुचना देतानाच इतर कामाच्या सुचना देखील त्यांनी केल्या. त्यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसोबत आपण संपूर्ण अलिबाग तालुक्याचा दौरा केला. वेश्‍वी, कुरुळ, धोकवडे, सासवणे कुर्डूस, बिडवागळे तसेच मोठी धरणे तलाव यातून पाणी घेतले गेले पाहिजे. भविष्यात गेलच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार आहे. मात्र इतर वापरासाठी या योजनेचा उपयोग होईल. त्याचा वेगळी टाकी, वेगळी पाईप लाईन असेल. कुरुळमध्ये आणखी कामे करण्याचा आपला प्रयत्न असून शेकापक्षाच्या माध्यमातून कुरुळचा सर्वांगिण विकास करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय पाटील, माजी सरकारी वकील अ‍ॅड प्रसाद पाटील यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचनल अ‍ॅड विजय पाटील यांनी केले. उपस्थितांचे स्वागत ग्रामपंचायतीचे सदस्य भुषण बिर्जे, रमेश पाटील, अभिजित घाडगे यांनी केले. कार्यक्रमासाठी चिदबादेवी नवरात्रौत्सव मंडळ कुरुळ, सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ बापदेव नाका यांच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्य व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version