जिल्ह्याचा विकास अडचणीत

आमदारांचा निधी तिजोरीत; आमदार निधीतील 4 कोटी शिल्लक

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

एकीकडे निधीअभावी विकासकामे रखडल्याची आरोळी ठोकली जात असताना दुसरीकडे आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत मिळालेला कोट्यवधी रुपयांचा निधी मात्र अखर्चित पडून असल्याचे वास्तव समोर आले आहे. अलिबाग आणि कर्जत मतदारसंघात लाखो-कोट्यवधींच्या कामांचा गाजावाजा केला जात असतानाच प्रत्यक्षात निधी खर्चाच्या बाबतीत मोठी पिछाडी दिसून येत आहे. त्यामुळे ‘निधी नाही म्हणून कामे होत नाहीत’ हा दावा कितपत खरा, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

विधानसभा मतदार संघातील कार्यक्षेत्रातील स्थानिक विकासासाठी आमदारांना निधी प्राप्त झाला. यामध्ये अलिबाग विधानसभा मतदार संघातील आमदार महेंद्र दळवी व कर्जत मतदार संघातील आमदार महेंद्र थोरवे हा निधी खर्च करण्यास पिछाडीवर असल्याचे समोर आले आहे. आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत प्राप्त झालेल्या निधीपैकी एक ते दीड कोटीहून अधिक निधी अखर्चित असल्याचे दिसून आले आहे. करोडो रुपयांचा निधी आणून विकास कामे केल्याचा दिखावा करणाऱ्या आमदारांचे सत्य यावरून उघड झाले आहे.

रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, कर्जत, महाड, श्रीवर्धन, उरण, पनवेल या विधानसभा मतदार संघाची लोकसंख्या 26 लाख हून अधिक आहे. त्यामध्ये 24 लाख 88 हजार 788 मतदार आहेत. जिल्हयात दोन हजारहून अधिक गावे, वाड्यांचा समावेश आहे. मतदारसंघातील स्थानिक विकासासाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधीची तरतूद केली जाते. या लोकप्रतिनिधींसाठी शासनाकडून प्रत्येकी पाच कोटी असे एकूण 35 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. आमदारांनी सुचविलेल्या 36 कोटी रुपयांच्या 290 कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. प्रत्यक्षात 22 कोटी 12 लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीला शासनाकडून प्राप्त झाला.

मात्र लोकप्रतिनिधींनी आतापर्यंत 18 कोटी रुपयांचा निधी खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये अलिबाग विधानसभा मतदार संघातील प्रशासकीय मान्यता मिळालेल्या 40 विकासकामासाठी फक्त दोन कोटी 27 लाख रुपयांचा निधी आमदार दळवी यांनी खर्च केला आहे. कर्जत विधानसभा मतदारसंघातील आमदार महेंद्र थोरवे यांनी मान्यता मिळालेल्या 46 कामांसाठी दोन कोटी 31 लाख रुपयांचा निधी खर्च केल्याची माहिती उघड झाली आहे. इतर लोकप्रतिनिधींच्या तुलनेने आमदार दळवी आणि आमदार महेंद्र थोरवे निधी खर्च करण्यास पिछाडीवर असल्याचे समोर आले आहे.

शिंदे गटातील दोन्ही आमदारांनी त्यांच्या मतदार संघात करोडो रुपयांचा निधी आणल्याची जाहीरात बाजी मोठया प्रमाणात केली. प्रत्यक्षात मात्र प्राप्त झालेल्या निधीमधील खर्चदेखील शंभर टक्के करण्यास दोन्ही आमदार अपयशी ठरल्याचे आकेडवारीनुसार दिसून आले आहे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी वीस दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे उर्वरित निधी खर्च करण्यास लोकप्रतिनिधी यशस्वी ठरतील का, असा प्रश्न जनमानसातून उमटला जात आहे. निधी पडून राहिल्याने मतदार संघात पायाभूत सुविधांची कामे प्रलंबित राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

निधी खर्च केल्यावर दृष्टीक्षेप

आमदारप्राप्त निधीप्र.मा.कामेखर्च केलेला निधीप्र.मा. रक्कम
महेंद्र थोरवे- 309.2646231.48489.45
महेंद्र दळवी –332.8142227.25535.74
प्रशांत ठाकूर –308.8647254.70514.65
महेश बालदी – 314.6240288.33434.01
रवि पाटील – 303.9933282.57612.07
आदिती तटकरे – 333.9442284.68432.66
भरत गोगावले – 309.4840298.01604.24
एकूण – 2212.962901867.023622.82
Exit mobile version