आंदोलनाची दिशा ठरणार बीडमध्ये

| जालना | वृत्तसंस्था |

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी अधिवेशनात भूमिका मांडणार आहेत. त्यामुळे आधी त्यांची भूमिका समजली पाहिजे. त्यामुळे रविवारी आंतरवाली सराटीमध्ये ठरवली जाणारी आंदोलनाची दिशा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मनोज जरांगे-पाटील यांनी दिली.

बीड येथे होणाऱ्या 23 डिसेंबरच्या सभेत याबाबत घोषणा करण्यात येणार असल्याचा निर्णय मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आला आहे. त्यामुळे आता मराठा आंदोलनाची पुढील दिशा काय असणार याचा अंतिम निर्णय बीडच्या सभेतच होणार आहे. त्यामुळे आता या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

24 डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ठाम असल्याचे सांगण्यात आले आहे. मराठा आरक्षण मिळेपर्यंत राज्यात नोकरभरती करण्यात येऊ नये. जर नोकरभरती करायची असेल, तर मराठ्यांना काही हरकत नाही. पण, नोकरभरती करण्याचा निर्णय घेताना मराठ्यांच्या सर्व जागा राखी ठेवून नोकरभरतीचा निर्णय घ्या, अशी मागणी जरांगेंनी केली.

Exit mobile version