डॉक्टर शटर डाऊन करुन गायब

| पेण | प्रतिनिधी |

परळी येथील स्वतःला डॉक्टर समजणारे सुभाष दास यांचे दोन दिवसांपूावी स्टिंग ऑपरेशन करुन कृषीवलने खरी परिस्थिती समोर आणली होती. त्यानंतर शुक्रवारी पंचनामा करण्यासाठी गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना डॉक्टर चालवत असलेल्या धन्वंतरी क्लिनिकचे शटर डाऊन करुन तो गायब असल्याचे दिसले, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी शशिकांत मढवी यांनी दिली.

ते म्हणाले की, जांभुळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक वामन मांगे हे सदरील धन्वंतरी क्लिनिकचा पंचानामा करण्यासाठी गेले असता, धन्वंतरी क्लिनिकचे शटर बंद असल्याचे आढळून आले. शशिकांत मढवी यांनी सांगितले की, धन्वंतरी क्लिनिक बंद आहे. तेथील डॉक्टर गायब आहेत. परंतु, आम्ही या डॉक्टरवर लक्ष ठेवून आहोत. त्यांच्याविरुद्ध आम्ही पोलीस ठाण्यात तक्रारदेखील देत आहोत. जर डॉक्टर खरे असतील, तर त्यांनी आम्हाला संपर्क केला असता, अशाप्रकारे शटर बंद करून गायब झाले नसते, असेही मढवी म्हणाले.

कृषीवलचे आवाहन
आज ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अशा तोतया डॉक्टरांचे पीक आलेले आहे. अशा डॉक्टरांविषयी कोणाकडे माहिती असल्यास त्यांनी कृषीवलशी संपर्क साधावा, आम्ही अशा डॉक्टरांचा खरा चेहरा सर्वसामान्यांसमोर आणल्याशिवाय राहणार नाही.

Exit mobile version