आ. भरत गोगावलेंकडून 19 लाखाचा निधी
| बोर्लीपंचतन | प्रतिनिधी |
दिवेआगर, बोर्ली पंचतन, शिस्ते या गावालगत असलेल्या यशवंत खारभूमी उघाडीचे दरवाजे बसविण्याच्या कामास सुरूवात झाली असून, यासाठी आ. भरत गोगावले यांनी 19 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. काम तात्काळ मार्गी लागावे यासाठी शिंदे गटाचे शाम भोकरे यांनी पाठपुरावा केला. यामुळे शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
यावर्षी खारभूमी शेतकर्याला ओल्या दुष्काळाला सामोरे जावे लागणार नसून, या परिसरातील शेतकरी दरवाजे पूर्ण बसवून झाल्यावर शेतीच्या कामाला सुरुवात करतील, अशी चर्चा आहे. फायबरचे नवीन दरवाजे बसविल्याबद्दल आ. भरत गोगावले, शाम भोकरे यांना शेतकरी धन्यवाद देत आहेत.