सर्पमित्रांकडून अजगरास जीवदान

| रोहा | वार्ताहर |

उडदवणे गावातील सर्पमित्र दीपक कोल्हटकर यांनी 12 फुटी अजगरास जीवदान दिले आहे. येथील एका कालव्यात हा भला मोठा अजगर आढळून आला होता. मुठवली खुर्द गावात राम वामन तुपकर यांच्या घरासमोरील कालव्यामध्ये अत्यंत अडचणीच्या भागात अजगर असल्याची माहिती सर्पमित्र दीपक कोल्हटकर यांना मिळाली. त्यांनी क्षणाचा विलंब न लावता घटनास्थळी जाऊन भल्या मोठ्या बारा फुटी अजगरास सहकारी अभय कराळे व नयन पाटील यांच्या प्रयत्नांमुळे मोठ्या शिताफीने पकडून त्याला सुरक्षितरीत्या जंगल भागात सोडण्यात आले. या वेळी भल्या मोठ्या अजगराचा प्रतिकार पाहून पाहणाऱ्यांचाही थरकाप उडत होता. आतापर्यंत दीपक कोल्हटकर यांनी शेकडोहून अधिक विविध विषारी व बिनविषारी जातींच्या सापांना जीवदान देऊन त्यांचे प्राण वाचविले आहेत.

Exit mobile version