पिण्याच्या पाण्याची विहीर कोसळली; नागरीकांची वणवण

| पोलादपूर | वार्ताहर |

तालुक्यातील वाकण गावठाण येथे असलेली विहीर दि.7 रोजी रात्रीच्या 9 ते 11 वाजण्याच्या सुमारास कोसळली. त्यामुळे या पाण्यावर उपजीविका करणाऱ्या नागरिकांना पाण्यासाठी अन्यत्र भटकावे लागत आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने येथील नागरीकांच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांसह वाकणच्या तलाठी पवार यांनी घटनास्थळी हजर राहून विहिरीची पाहणी करुन पंचनामा केला. यावेळी ग्रामस्थ म्हणून सुरेश साने, निळकंठ साने उपस्थित होते. या विहिरीचे सुमारे पाच लाख 55 हजार 600 रुपयांचे नुकसान झाले आहे. सदरची विहीर 40 फूट खोल व 43 फूट रुंद होती.

Exit mobile version