रहाटले येथील येथील मॅक्सीमो अपघातातील चालकाचाही उपचारा दरम्यान मृत्यू

। अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
मांडवा जेट्टी उघडीवर शनिवारी (दि. २१) सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका पर्यटक तरुणीचा मृत्यूनंतर उपचारा दरम्यान गंभीर जखमी झालेल्या चालकाचा देखील पनवेल येथे मृत्यू झाला आहे. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या दोन झाली आहे. तर चार जण जखमी झाले आहेत.


विश्वनाथ मुकुंद पेढवी असे चालकाचे नाव आहे. तर वर्षा कुटे या तरुणीचे देखील अपघातात मृत्यू झाला होता.डोंबिवली येथून अलिबागला फिरण्यासाठी आलेले पर्यटक मांडवा येथून मॅक्सीमोमधून प्रवास करत होते. सदर मॅक्सीमो मांडव्यापासून काही अंतरावर असलेल्या रहाटले येथील उघडी जवळ आली असताना चालकाचे नियंत्रण सुटून उघडी खाली विरुद्ध बाजूला जावून कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की यात वर्षा कुटे रा डोंबिवली वय 27 या तरुणीचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. तर चालक आणि चार प्रवासी असे एकूण पाच जण जखमी झाले होते. गंभीर जखमी झालेल्यांपैकी चालक विश्वनाथ मुकुंद पेढवी यांच्यावर पनवेल येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. आज उपचारा दरम्यान विश्वनाथ पेढवी यांचा मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या दोन झाली आहे. या अपघात प्रकरणी मांडवा पोलिस ठाण्यात चालक विरोधात मोटार वाहन अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक फौजदार के ए पाटील करीत आहेत.

Exit mobile version