अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
शारीरिक व्यायामातुन शरीर स्वस्त,सदृढ होत,पण मन सशक्त आणि मजबूत ठेवण्यासाठी ,आपला आत्मविश्वास दृढ करण्यासाठी खरी गरज आहे ती योग साधनेची या योग साधनेतूनच जन्म- मृत्यू च्या पलीकडे मोक्षाची अनुभूती घेता येते. असे प्रतिपादन प्रसिध्द योगा अभ्यासिका सौ. सिम्पल हिमांशू सहानी यांनी अलिबागेत बोलताना केले.
शहरातील मयूर बेकरीच्या इमारतीवरील सभागृहात शेट्टे आयोजित योग आणि गंमत प्रशिक्षण कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. या योग कार्यशाळेत किशोरवयीन मुली,विवाहीता,तरुणी आणि तरुण सहभागी झाले होते.
सिम्पल सहानी यांनी ,योग साधनेत ओंकाराचे महत्व काय, आणि तो कशा प्रकारे लावावा,हे प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून पटवून दिले. श्वासावर नियंत्रण कसे ठेवावे. ओंकार किती वेळा, किती मिनिटे लावावा,त्याचे मनावर कसे सकारात्मक परिणाम होतात,हे देखील विषद केले. ओंकाराच्या तीन मात्रांविषयी माहिती दिली.
योग साधनेत अष्टांगाचे महत्व विषद करताना ते कोणते आणि त्यांचे कार्य कोणते,ते कशा प्रकारे करावे याची माहिती दिली.यात प्राणायाम किती आणि कसा महत्वाचा हे प्रात्यक्षिक करून पटवून दिले. त्यानंतर योग साधनेतिल आसने कार्यशाळेत सहभागी झालेल्याना त्यांच्या अनुयायांनी करून दाखविली. आणि ती आसने त्यांच्या कडून करून घेतली. या मध्ये सूर्यनमस्कारा सह इतर काही आसनांचा समावेश होता.
विशेष म्हणजे सिम्पल सहानी यांनी योगा मध्ये डॉक्टरेट मिळवली आहे.आयुष्य मंत्रालया कडून त्याना योगा प्रशिक्षक म्हणून प्रशस्तीपत्र मिळाले आहे. गेली 7 वर्ष त्या देशात आणि परदेशात जाऊन योग साधनेवर लेक्चर ।देण्याचे काम करीत आहेत.