। खारेपाट । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील वाडगाव येथे अलिबाग तालुका कुस्तिगीर संस्था व जय हनुमान तालीम संघ वाडगावं यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका अजिंक्यपद निवड चाचणी कुस्ती स्पर्धा बुधवारी (दि.25) वाडगाव येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत प्रमोद मनोहर भगत यांच्या मार्गदर्शनातून घडलेल्या पैलवानांच्या श्री काळभैरव तालीम संघाने नेत्रदिपक खेळाचे प्रदर्शन करून उपस्थितांची मने जिंकली. श्री काळभैरव तालीम संघातील यशस्वी पैलवानांना प्रशस्ती पत्रक व पदक देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेमध्ये आवासच्या श्री काळभैरव तालीम संघातील खेळाडूंची रायगड जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कुस्ती स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. श्री काळभैरव तालीम संघ आवासचे प्रशिक्षक प्रमोद भगत व सर्व यशस्वी पैलवानांवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.
प्रथम क्रमांकाचे मानकरी
हौशी गट मुली- समीक्षा पाटील (36 किलो) व मीरा पाटील (39 किलो). हौशी गट मुले- पवन मांजी (38 किलो). सब जुनियर गट मुले- निशाल कुमार मांजी (51 किलो) व प्रणव म्हात्रे (92 किलो). महिला वरिष्ठ गट- युक्ता मढवी (53 किलो) व मनीषा गुरूम (62 किलो). केसरी महिला गट- सुरक्षा थळे (65 ते 76 किलो). वरिष्ठ गट पुरुष माती विभाग- शुभम म्हात्रे (86 किलो) व अंश धोंडसेकर (97 किलो).
