डोक्यात रॉड घालून बापाने मुलाला संपवलं

| नागपूर | वृत्तसंस्था |

नागपूरात एक धक्कादायक घटना घडली आहे. बाप फोनवर मोठ्याने बोलत असल्याने मुलाने त्याला डिवचले होते. या कारणावरून बापाने आपल्या मुलाची हत्या केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील पिंपरा गावातील आरोपी रामराव काकडे हा फोनवरुन मोठ्याने बोलत होता. याचा राग त्याचा मुलगा सुरज काकडे याला आला. त्याने बापाला हळू बोलण्याचा सल्ला दिला. या मुद्द्यावरुन त्यांच्या दोघांमध्ये वाद सुरु झाला. रागाच्या भरामध्ये रामराव यांनी एका लोखंडी रॉडने आपल्या मुलावर हल्ला केला. या प्रसंगावेळी मुलगा आणि बाप दोघे मद्याच्या अमलाखाली होते. सुरजला गंभीर जखम झाल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपीवर आयपीसीच्या कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून बुधवारी (दि.27) रामराव काकडेला अटक करण्यात आली आहे. पोलीस पुढील कारवाई करत असून अधिक तपास सुरु आहे. 

Exit mobile version