डिसेंबरमध्ये उडणार पहिलं प्रवासी विमान

सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना कारण्यासाठी लागणार उशीर

| पनवेल ग्रामीण | वार्ताहर |

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (दि.5) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. याकरता पंतप्रधान मोदी मुंबईत येणार असून, दुपारी दोन वाजून 40 मिनिटांनी पंतप्रधान मोदी यांचे विमान नवी मुंबई विमानतळावर उतरणार असल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघलं यांनी दिली. बेलापूर येथील सिडकोच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सिंघलं यांनी ही माहिती दिली असून, डिसेंबर महिन्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिले विमान उड्डाणं होणार असल्याची माहिती यावेळी दिली.

बहुप्रतिक्षित नवी मुंबई विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. भारतातील सर्वात मोठ्या विमान तळा पैकी एक असलेल्या या विमान तळाचा विकास तीन टप्प्यात केला जात आहे. पहिल्या टप्प्याच्या अखेरीस विमानतळाची क्षमता दरवर्षी सुमारे 20 दशलक्ष प्रवाशांना हाताळण्याची असणार आहे. याशिवाय, तिसऱ्या टप्प्याच्या पूर्णतेनंतर, नवी मुंबई विमानतळ दरवर्षी सुमारे 90 दशलक्ष प्रवाशांना आणि 2.5 दशलक्ष टन मालवाहतूक करण्यास सक्षम होणार असल्याची माहिती देताना पहिल्या टप्प्यात जवळपास 15 ते 20 हजार कर्मचाऱ्यांना रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच भविष्यात या ठिकाणी 1 लाख रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती देखील सिंघल यांनी या वेळी बोलताना दिली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुमारे 1 हजार 160 हेक्टर क्षेत्रात पसरलेले आहे.सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष सिंघल यांनी या विमानतळाची तुलना थेट लंडनच्या ‘हीथ्रो’ विमानतळाशी करून त्याच्या भव्यतेची ग्वाही दिली आहे. विशेष म्हणजे, नवी मुंबईतील हे विमानतळ पहिल्यांदाच जलमार्गाने गेटवे ऑफ इंडिया किंवा इतर ठिकाणी प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी जलजेट्टीशी जोडले जाईल, असे देखील सिंघल यांनी यावेळी स्पष्ट केले.

सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी लागणार उशीर
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते रविवारी नवी मुंबई विमान तळाचे उदघाटन होणार असले तरी विमान तळावरून प्रवासी उड्डाणं सुरु होण्यासाठी डिसेंबर महिना उजाडणार आहे. उद्घाटन झाल्यावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला कडे विमान तळाचा ताबा देण्यात येणार आहे. सीआईएसएफकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाय योजना करण्यात आल्या नंतरच पाहिलं विमान उड्डाणं होणार असून, या सर्व प्रक्रियेला 45 दिवसांचा कालावधी लागणार असल्याने डिसेंबरमध्ये पहिले प्रवासी विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेणार आहे.
नामकरणच्या प्रश्नाला बगल
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि बां पाटलांचे नाव कधी लागणार या पत्रकारांच्या प्रश्नाला विभागीय संचालक सिंगल यांनी बगल दिली असून याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी माहिती दिल्याचे सांगत प्रश्नाचे उत्तर देणे टाळले आहे.
Exit mobile version