| ठाणे | प्रतिनिधी |
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. मुंबई, पुणे, ठाणे यासारख्या शहरांत रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. असे असतानाच आता ठाणे जिल्ह्यातून मोठी माहिती समोर येत आहे. येथे अवघ्या 21 वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यात 21 वर्षीय तरुण कोरोनाचा पहिला बळी ठरला आहे. ठाण्यातील कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 21 वर्षीय तरुणावर गेल्या काही दिवसांपासून कोरोनावर उपचार चालू होते. मात्र, उपचारादरम्यान त्याने याच रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. हा तरुण मुंब्रा येथील रहिवासी आहे. सकळी 6 वाजेच्या सुमारास त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्याला 22 मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार चालू असताना त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल काल समोर आला होता. त्याची ही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्याचा आज सकाळी 6 वाजता उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे.