| बीड | प्रतिनिधी |
बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात झोपेतच सर्पदंश झाल्याने सख्या बहिण भावाचा मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी (दि. 24) रोजी मध्यरात्री 12 ते 1 वाजताच्या सुमारास प्रदीप मुंडे यांच्या राहत्या घरी घडली. सख्खे बहिण-भाऊ घरात झोपलेले होते. रात्री उशिरा त्यांना सर्पदंश झाला. सुरुवातीला दोघांनाही काही समजले नाही, परंतु त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघडल्याने कुटुंबीयांनी तातडीने त्यांना रुग्णालयात नेले. पण तोपर्यंत उशीर झाला होता. रुग्णालयात पोहोचेपर्यंत दोघांचीही प्रकृती अधिकच गंभीर झाली होती. डॉक्टरांनी तपासणी करून उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. कोमल मुंडे (15) आणि शिवम मुंडे (12) असे मृत बहिण भावाचे नाव आहे. गेल्या चार दिवसांपासून बीड जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली असून, परिसरात सरपटणाऱ्या प्राण्यांमुळे जीवाला धोका निर्माण झाला आहे. प्रशासनानं नागरिकांना खबरदारीचे आवाहन केलं आहे. या घटनेने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.