कागदी आकाश कंदीलाचा झगमगाट

| पनवेल । वार्ताहर ।
राज्य सरकारने प्लास्टिक बंदी केल्यानंतरही बाजारात प्लास्टिकचे आकाश कंदील विक्रीला आले आहेत. मात्र, अनेक जागरूक ग्राहक खास इकोफ्रेंडली आकाश कंदिलाची मागणी करीत आहेत. या संधीचा व्यावसायिक फायदा उचलत काही व्यापार्‍यांनी खास जुन्या पद्धतीचे पारंपरिक आकाश कंदील विक्रीसाठी आणले आहेत.

काही महिलांनी रंगीत कागदाचा वापर करून जुन्या पद्धतीचे आकाश कंदील तयार केले. चांदणी व षटकोनी आकाश कंदील बनवून ते छोट्याखानी दुकानात लटकवून ठेवले. प्लास्टिकच्या आकाश कंदिलात हे कागदी आकाश कंदील उठून दिसत असल्याने व 20 ते 25 वर्षांपूर्वीच्या दिवाळीची आठवण करून देत असल्याने हे आकाश कंदील सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहेत. यंदा शहरातील काही महिलांनी प्लायवूड व चमकीचे जाळीदार कपडे व लेसचा वापर करून आधुनिक पद्धतीचे आकाश कंदील तयार केले आहेत. त्यांना मागणी चांगली असल्यामुळे महिलांमधील उत्साह देखील वाढला आहे.

Exit mobile version