। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।
मोबाईलचा ॲक्सेस घेऊन आयफोन खरेदी केला आणि मोबाईलचे 82 हजार 933 रुपये क्रेडिट कार्ड मधून भरून फसवणूक केल्या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात 30 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
वैभव सावंत हा चांभार्ली, मोहोपाडा येथे राहत असून त्याच्या मोबाईलमध्ये फ्लिपकार्ट अकाउंट आहे. 29 जानेवारी रोजी व्हॉट्सॲपवर एपीके फाईल आली. आरटीओ संदर्भातील फाईल असल्याने ती डाऊनलोड केली. त्यानंतर संध्याकाळी क्रेडिट कार्ड मधून 238 रुपये डेबिट झाल्याचे दिसून आले. आणि पुन्हा क्रेडिट कार्ड मधून 82 हजार 933 रुपये डेबिट झाल्याचे समजले. यावेळी मोबाईलचा एक्सेस घेऊन सायबर फ्रॉड झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी कस्टमर केअरला फोन करून क्रेडिट कार्ड ब्लॉक केले. फ्लिपकार्ट अकाउंट ओपन केले असता तीन टॅक्स इन्व्हाईस बिल प्राप्त झाले. अनोळखी व्यक्तीने त्यांच्या मोबाईलचा एक्सेस घेऊन फ्लिपकार्ट अकाउंट वरून आयफोन खरेदी केला आणि त्याचे बील क्रेडिट कार्ड मधून भरून फसवणूक केली.







