| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल जवळील करंजाडे येथील रामचंद्र मालुसरे यांच्या निमिषा फोटो शॉपमध्ये एका व्यक्तीने विविध प्रकारचे कॅमेरे व इतर वस्तू भाड्याने घेतल्या. त्यानंतर त्याने ते परत न केल्याने त्याने लाखोंची फसवणूक केल्या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संजय पांडुरंग कदम असे फसवणूक करणाऱ्याचे नाव आहे. यादरम्यान, संजय कदम याने मोबाईल नंबर बंद करून तीन राज्यातील राहण्याचे पत्ते बदलुन परागंदा झाला होता. त्यामुळे त्याचा शोध लागणे कठीण झाले होते. मात्र, पनवेल पोलिसांच्या पथकाने संजय कदमने वापरलेल्या मोबाईल नंबरचे तांत्रिक माहिती व विश्लेषणाच्या आधारे तो दमण येथे राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पनवेल पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने संजय कदम याला ताब्यात घेतले. तसेच, फसवणुक करून अपहार केलेले फोटोग्राफीचे काही साहित्य हस्तगत करण्यात आले. तसेच, त्यातील काही साहित्य मुंबई येथील एका कॅमेरा दुकानात विकल्याचे सांगितल्याने त्यांच्याकडुन देखील विकलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे.






