सत्तेचे सिंहासन उध्वस्त करा पवारांचा एल्गार
| अहमदनगर | प्रतिनिधी |
गेल्या दहा वर्षांत भारतीय जनता पक्षाने सत्तेचा गैरवापर केला. सत्तेची मस्ती त्यांच्या डोक्यात गेली आहे. त्यांच्या सत्तेचे सिंहासन आपल्याला उध्वस्त करायचे आहे. नगर जिल्हयातही अनेक प्रश्न आहेत. त्या सर्वांचे उत्तर नीलेश लंके आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांना तुम्ही दिल्लीत पाठवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
यावेळी बोलताना पवार म्हणाले, निवडणूक ही सत्ताधार्यांना हिशोब मागण्याची वेळ असते. तसा हिशोब सध्या आम्ही मागत आहोत. या सरकारने काहीच केले नाही. जे केले, ते सत्तेचा गैरवापर करून विरोधक आणि जनतेला त्रास देण्याचे काम केले. या सरकारची आता हूकूमशाहीकडे वाटचाल सुरू झाली. त्यामुळे या निवडणुकीत आम्ही त्यांच्या सत्तेचे सिंहासन उद्धस्थ केल्याशिवाय राहणार नाही, असेही पवार म्हणाले. नगर जिल्ह्याविषयी बोलताना त्यांना विखे पाटील परिवारवर जोरदार टीका केली. पवार म्हणाले, पदश्री विठ्ठलराव विखे पाटलांनी सहकारी साखर कारखाना काढला. पण नंतरच्या पिढीने काय केले? त्यांची तिसरी पिढी आता राजकारणात आहे. मात्र वडीलधार्यांचा मान ठेवण्याचे सौजन्यही त्यांच्याकडे नाही. नगर जिल्ह्यात अनेक प्रश्न आहेत, त्या सर्वांचे उत्तर नीलश लंके हे आहे. त्यामुळे आम्ही हा उमेदवार दिला असून त्याला दिल्लीला पाठवा, असे आवाहन पवार यांनी केले. वचनं तुम्ही पाळली नाही अन् शिव्या आम्हाला देता? शरद पवारांनी मोदींना ऐकवलं, भाषण गाजवलं महाविकास आघाडीचे उमेदवार लंके यांच्या प्रचारासाठी राहुरीत आयोजित सभेत पवार बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, आ. लहू कानडे, माजी आ. डॉ. प्रसाद तनपुरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.