अलिबागमध्ये बोकड चोरीला

। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग येथे जयभवानी मटण शॉपमधून 10 हजाार पाचशे रूपये किमतीचा बोकड चोरीला गेला.
अलिबाग पोलीस ठाण्यात दि.10 ऑक्टोबर ते दि. 11 ऑक्टोबर च्या दरम्यान फर्यादी रा.भाल अलिबाग यांच्या जयभवानी मटण शॉप या दुकानातुन एकूण 10 हजाार पाचशे रुपये किमतीचा बोकड चोरीला गेला होता. फिर्यादी यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी तपास केला असता यातील संशयित आरोपीत रा.शास्ञीनगर ता.अलिबाग याने फिर्यादी यांचे दुकानाच्या बाजुला असलेले पत्रे व छप्पर यामधील मोकळया जागे मधुन आत प्रवेश करुन फिर्यादी यांच्या समंतीशिवाय लबाडीच्या हेतुने घरफोडी चोरी करुन स्व:ताच्या फायदयाकरीता चोरुन नेले आहे.

याबाबत अलिबाग पोलीस ठाणे येथे गु.र.नं.169/2021 भा.दं.वि.क.380,457 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सपोनि/श्री.लहांगे हे करीत आहेत.

Exit mobile version