वशेणीच्या इतिहासातील सोनेरी पान हरपले : प्रा. पाटील

| श्रीवर्धन | वार्ताहर |
उरण तालुक्याच्या वशेणी गावातील एक प्रख्यात कीर्तनकार, प्रवचनकार, आदर्श शिक्षक चंद्रहास चां. गावंड गुरुजी यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 10 जुलै रोजी अ‍ॅड. गुलाबराव गावंड यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा झाली.

सभेला रायगड भूषण प्रा. एल.बी. पाटील, इंडिया झिंदाबाद फ्रेण्ड्स गु्रपचे अध्यक्ष रमेश थवई, निलेश म्हात्रे, अ‍ॅड. हिरामण पाटील, सरपंच जीवन गावंड, लवेश म्हात्रे, कृष्णा ठाकूर, गणपत ठाकूर, रवि पाटील, नारायण पाटील, गजानन पाटील, डी.बी. पाटील, दीपक म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

शोकसभेत बोलताना म.रा.साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य प्रा. एल.बी. पाटील म्हणाले की, चंद्रहास गावंड गुरुजी म्हणजे वशेणीच्या इतिहासातील सोनेरी पान होते. त्यांच्या अंगी असणारे कलागुण हे त्यांनी स्वतःपुरते न ठेवता समाजासाठी अर्पण केले. म्हणून त्यांच्या कार्याचा स्मृतीगंध केवळ वशेणीच्या मातीपुरता न राहता सातासमुद्रापार गेला आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन वशेणी इतिहास संपादकीय मंडळ व गावंड परिवार यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Exit mobile version