। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील सचिन तांडेल मेमोरियल फाऊंडेशन कळंबुसरेतर्फे कळंबूसरे गावातील श्रीमती महिलांना दिवाळी निमित्त गृहोपयोगी वस्तू भेट स्वरुपात देण्यात आल्या. घरातील कर्ता पुरुष हरपल्यानंतर आपल्या कुटुंबाचा गाडा यशस्वीपणे पुढे हाकत आपल्या कुटुंबाचा पालन पोषण करत असणार्या अशा नारीशक्तीला संस्थेमार्फत संस्थेच्या सभासदांकडून घरोघरी जाऊन गृहोपयोगी भेट वस्तू वाटप करण्यात आल्या. कळंबुसरे गावातील 105 महिलांना भेट वस्तू देण्यात आले. सदर उपक्रम रत्नाकर केणी, कैलास पाटील, सुहास गावंड, प्रभूश्वर म्हात्रे, प्रविण पाटील, चंद्रहास जमदडे, सचिन भोईर, समीर म्हात्रे, मिलिंद ठाकूर, नीरज पाटील, नयन म्हात्रे, अमित पाटील, नंदकुमार तांडेल, प्रशांत पाटील या सर्वानी यशस्वीरित्या पार पाडले.