पतसंस्थेचा आलेख कायम चढता राहिल

| पेण । प्रतिनिधी।
पेण प्राथमिक शिक्षक पत संस्थेची 98 वी वार्षिक सभा नुकतीच पार पडली. त्यावेळी सभासदांना मार्गदर्शन करताना पत संस्थेचे अध्यक्ष सोपान रामचंद्र चांदे यांनी सांगितले की, जिल्हयातील पेण प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे काम पारदर्शक करून पत संस्थेचा आलेख चढता ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. सभासदांनी माझ्यावर विश्‍वास टाकला आहे त्या विश्‍वासाला तडा जाऊ देणार नाही, व विश्‍वास सार्थ ठरवेल. येत्या काळामध्ये सर्व सहकार्यांना विश्‍वासात घेउनच पत संस्थेची प्रगतीची घोडदौड सुरू राहिल. तसेच सभासदांना देत असलेल्या कर्जात वाढ केली जाईल, जे निर्णय घेतले जातील ते पतसंस्थेच्या हिताचे घेतले जातील.

यावेळी व्हाईस चेअरमन कैलास भोईर, मोहन पाटील, वसंत मोकल, रविंद्र पाटील, आनंद पाटील, विनोद जोशी, विठोबा पाटील, कृष्णा पिंगळा, मोहन भोईर, सुभाष बुंधाटे, विज्ञान पाटील, संदिप म्हात्रे, अरविन्द मोरे, हितेंद्र म्हात्रे, महेंद्र शिर्के, जीवन तेंलगे, संदिप पाटील, जगदिश म्हात्रे, उज्वला कनोजे, सुमित्रा खेडेकर, जितेंद्र मक, सचिव गजानन मोकल, आदिंसह जिल्हयातील सर्व संघटनाचे अध्यक्ष पदाधिकारी कायकर्ते व पतसंस्थेचे सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version