पावसाळी साहित्यांनी तळा बाजारपेठ सजली

शालेय साहित्य खरेदीसाठी नागरिकांची लगबग

| तळा | प्रतिनिधी |

नुकतीच पावसाळा सुरुवात झाली असल्याने पावसाळ्यात लागणार्‍या साहित्यांनी तळा बाजारपेठ सजली आहे. तळा बाजारपेठेत शालेय विद्यार्थ्यांना उपयोगी साहित्य बाजारात दाखल झाले असून विद्यार्थी व त्यांच्या पालकांची शालेय साहित्य खरेदीसाठी रेलचेल सुरू झाल्याचे पहावयास मिळत आहे. सर्व शाळा 15 जूनला सुरू होणार असल्याने बाजारपेठेत वह्या, दप्तर, टिफीन, रेनकोट, छत्र्या, बुट, चप्पल, कमरपट्टे, पेन, कंपासपेटी व इतर साहित्य दुकानदारांनी विक्रीस आणले आहेत. मात्र, मागील वर्षापेक्षा यावर्षी किंमती वाढल्याचे दिसत आहे. तरीही ग्राहक, विद्यार्थी पालक बाजारात वस्तू खरेदीसाठी सध्या मोठ्या प्रमाणात येत असल्याचे दिसत आहे. तसेच नागरिकही पावसाळपूर्व छत्र्या, मेनकापड, रेनकोट इत्यादी साहित्य खरेदी करताना पहावयास मिळत आहेत. मात्र, यावर्षी सर्वच वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने पालकांना अधिकचा आर्थिक फटका बसला आहे.

शालेय वस्तूंची बाजारातील किंमत 
बाजारात कटवही 200 पेजेस 440 रूपये डझन, फुलसाईझ 200 पानी वही एक डझन 490 रूपये, तर छत्रीचे भाव 200 रूपयांपासून पुढे 500 पर्यंत, टीफीन डबा प्लास्टिक 80 रूपयापासून 200 दरम्यान तसेच स्टील डब्बे 180 ते 300 दरम्यान, वॉटर बॅग 60 ते 100 पर्यंत व स्टील 200 ते 400 दरम्यान, रेणकोट 150, ते 500 च्या दरम्यान याप्रमाणे वस्तूंचे सध्या बाजारात भाव आहेत.
Exit mobile version