बेशिस्त वाहनचालकांचा कहर

| नवी मुंबई । प्रतिनिधी ।
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालकांना वचक बसावा म्हणून वाहतूक पोलिसांकडून ई-चलनाद्वारे कारवाई करण्यात येत आहे. मात्र, बहुतेक वाहनचालक पोलिसांच्या या कारवाईला दाद नसल्याचे दिसून येत आहे. कारण नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत गत वर्षात ई चलानने कारवाई केलेल्या 5 लाख 8 हजार 939 वाहनचालकांनी तब्बल 44 कोटी 70 लाख रुपयांच्या दंडाची रक्कम थकीत असल्याने अशा वाहनचालकांविरोधात न्यायालयीन कारवाई सुरू झाली आहे.

रस्त्यावरील अपघात रोखण्याबरोबरच वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहन नियमित कारवाई केली जाते. पूर्वी चौका-चौकात सिग्नलवर उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीचे नियम मोडणार्‍या वाहनचालकांना अडवून त्यांच्याकडून दंड वसूल केला जात होता. मात्र, नव्या नियमांनुसार वाहतुकीचे नियम मोडणार्‍या वाहनांच्या नंबर प्लेटच्या फोटोवरून संबंधित वाहनचालकाला ई-चलान पाठवले जाते आहे. याच अनुषंगाने गत 2022 या वर्षात नवी मुंबईतील वाहतूक पोलिसांनी मोटार कायद्याचे उल्लंघन करणार्‍या 7 लाख 99 हजार 956 वाहनचालकांवर ई -चलनाद्वारे कारवाई केली आहे.

11 हजार 939 न्यायालयीन प्रकरणे
दंडापोटी आकारण्यात येणारी 59 कोटी 96 लाख 69 हजार 800 रुपयांची रक्कम नवी मुंबई वाहतूक विभागास प्राप्त होणे अपेक्षित असताना अवघ्या 1 लाख 62 हजार 512 वाहनचालकांनीच 15 25 लाख 74 हजार इतका दंड भरलेला आहे. त्यामुळे तब्बल 44 कोटी 70 लाख 95 हजार 200 रुपयांच्या दंडाची रक्कम थकीत वसूल करण्याचे आव्हान वाहतूक पोलिसांसमोर असल्याने दंडाची रक्कम न भरणार्‍या 19 हजार 420 केसेसमधील 11 हजार 939 प्रकरणात न्यायालयीन कारवाईला सुरुवात केली आहे.

Exit mobile version