कृष्ठरोग निर्मूलनासाठी आरोग्य यंत्रणा धावली

| पनवेल । वार्ताहर ।
महापालिका आणि सहाय्यक संचालक आरोग्य सेवा(कृष्ठरोग) अलिबाग रायगड यांच्या वतीने येथे सर्व आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांची स्पर्श अभियानांतर्गत कुष्ठरोग जनजागृती मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. महानगरपालिकेमार्फत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारीपर्यंत राबविण्यात येणार आहे. आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या पंधरवड्यात कुष्ठरोगाविषयी विविध आरोग्य शिक्षणाचे कार्यक्रम येत आहेत. या कार्यक्रमांतर्गत खारघर येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कुष्ठरोग जनजागृती मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उपायुक्त कैलास गावडे, मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, डॉ.कुलकर्णी, वाहतुक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गावडे, जिल्हा कुष्ठरोग पर्यवेक्षक निलिमा धामणगावकर, जितेंद्र मढवी, सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी, मुख्यालयातील सर्व वैद्यकिय अधिकारी तसेच कर्मचारी, एएनएम, जीएनएमआशा वर्कर्स, वॉर्ड बॉय असे सुमारे 350 जण उपस्थित होते.

Exit mobile version