। मुंबई । वृत्तसंस्था ।
आजपासून शिवसेनेच्या आमदार पात्रतेच्या सुनावणीला सुरुवात झालेली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या 40 आमदारांची आणि शिवसेना ठाकरे गटाच्या 14 आमदारांची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर पार पडत आहे. शिवसेनेतल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर सोळा आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुरू झाली आहे. त्यासाठी शिंदे गट आणि ठाकरे गटाचे आमदार विधीमंडळात दाखल झालेले आहेत.
शिवसेनेतल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर सोळा आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी राज्य विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात होत आहे. एकाच दिवशी सर्व 54 आमदारांची सुनावणी होईल. या सुनावणीसाठी शिवसेनेतल्या शिंदे गटाच्या 40 आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांना हजर राहावं लागणार आहे. त्यावेळी विधानसभा अध्यक्षांसमोर तब्बल 34 याचिकांवर सुनावणी होईल. या सुनावणीत वादी आणि प्रतिवादी आमदारांना पुरावे सादर करून आपलं म्हणणं मांडण्याची संधी देण्यात येईल. प्रत्येक याचिकेची वेगळी सुनावणी होणार असून, संबंधित आमदारांना त्या-त्यावेळी बोलावण्यात येणार आहे.
दरम्यान, ठाकरे गटाच्या ज्या-ज्या आमदारांना नोटीस धाडण्यात आलेली आहे ते सर्व आमदार सुनावणीसाठी उपस्थित आहेत. तसेच, विधानसभा अध्यक्षांनी आजच निर्णय द्यावा, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.
शिवसेनेच्या 'या' आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार एकनाथ शिंदे, शंभूराजे देसाई, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, यामिनी जाधव, संदीपान भुमरे, भरत गोगावले, संजय शिरसाठ, लता सोनवणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, बालाजी कल्याणकर, अनिल बाबर, संजय रायमूळकर, रमेश बोरनारे, महेश शिंदे.
ठाकरे गटाच्या 'या' आमदारांना अध्यक्षांची नोटीस अजय चौधरी, रवींद्र वायकर, राजन साळवी, वैभव नाईक, नितीन देशमुख, सुनिल राऊत, सुनिल प्रभू, भास्कर जाधव, रमेश कोरगावंकर, प्रकाश फातर्फेकर, कैलास पाटिल, संजय पोतनीस, उदयसिंह राजपूत, राहुल पाटील.
आतपर्यंत सुनावणीसाठी उपस्थित झालेल्या दोन्ही गटाच्या आमदारांची यादी शिंदे गट, यामिनी जाधव, भरत गोगावले, बालाजी किणीकर, रमेश बोरणारे, बालाजी कल्याणकार, सदा सरवणकर, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी, शांताराम मोरे, किशोर अप्पा पाटील, प्रदीप जैस्वाल, विश्वनाथ भोईर, ज्ञानराज चौगुले, नरेंद्र बोंडेकर, ठाकरे गट, सुनील प्रभू, सुनील राऊत, राहुल पाटील, अजय चौधरी, संजय पोतनीस, वैभव नाईक, नितीन देशमुख, भास्कर जाधव, रमेश कोरगावकर, उदयसिंह राजपूत, प्रकाश फातर्फेकर, राजन साळवी, कैलास पाटील.