पनवेलमध्ये उन्हाचा तडाका

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल व जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाली असून दुपारी रस्ते रिकामे होऊ लागले आहेत. तर दुसरीकडे रात्री थंडी पडणे सुरूच आहे. यामुळे दिवसा वाढते ऊन व रात्री थंडी अशी वातावरणाची विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात तापमानाचा पारा 32.6 अंशावर गेला आहे. साधारणपणे मकर संक्रांतीनंतर उन्हाचा चटका वाढतो. मात्र, जानेवारी हा महिना हिवाळ्याचाच असून कडक उन्हाळा सुरू होण्यासाठी फेब्रुवारी महिन्याची प्रतिक्षा असते. यंदा जानेवारी महिन्यातच तापमानाचा पारा चढला असून ऊन असहाय्य होत आहे. विशेष म्हणजे दिवसा वाढते ऊन व रात्री थंडी अशा वातावरणाचा अनुभव सध्या पनवेलकर घेत आहेत.

उन्हाळी फळे दाखल
उन्हाळा आला की, कलिंगड, खरबूज, काकडी या फळांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढते. या यंदाही कलिंगड, खरबूज काकडी ही फळे मोठ्या प्रमाणात बाजारात दखल झाली आहेत. मात्र, उन्हाळ्याची चाहुल लागताच रस्त्याच्या कडेला विक्री करणाऱ्या फळे विक्रेत्यांकडे ही फळे विक्रीसाठी दाखल झाली आहेत.
टोप्या, गॉगलच्या विक्रीत वाढ
उन्हाळा आला की, टोप्या विक्रेते, गॉगल विक्रेते दखल होतात. उन्हाळ्याची चाहुल लागताच सध्या शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात टोप्या विक्रेते दाखल झाले आहेत. टोप्या व गॉगलची मागणी वाढत आहे.
Exit mobile version