मुंबई- गोवा महामार्ग! उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मुंबई – गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाबद्दल मुंबई हायकोर्टाने आज सरकारला धारेवर धरले. या महामार्गाचं काम पूर्ण झाल्याशिवाय अन्य काम करू नये, अशी तंबी देत डिसेंबरपर्यत कामाच्या प्रगतीचा अहवाल हायकोर्टाला सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. एका याचिकेवर निर्णय देताना हा आदेश दिला गेला. कोकणातील पत्रकारांनी सतत सहा वर्षे लढा दिल्यानंतर रस्त्याचं काम 2010 मध्ये सुरू झालं होतं. न्यायालयाच्या आदेशानंतर या मार्गाचे काम लवकर पूर्ण होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version