| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
सावकारांच्या विरोधात 93 वर्षांपूर्वी चरीमध्ये शेतकऱ्यांनी एकत्र येत संप पुकारला होता. अन्नाचा एकही कण न पिकवता सात वर्षे प्रदीर्घ असे आंदोलन पुकारले होते. या संपाचा 93 वा वर्धापन दिन चरी येथे साजरा केला जाणार आहे. यानिमित्त शुक्रवारी (दि.27) सकाळपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमांच्या निमित्ताने या ऐतिहासिक संपाचा इतिहास उलगडणार आहे. आजच्या पिढीपर्यंत या लढ्याचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे.
सकाळी साडेआठ वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सुरुवातीला सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास चरी येथील शाळा ते ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत शाळेतील विद्यार्थ्यांमार्फत प्रभात फेरी काढण्यात येणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांच्या संघर्षाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी चरी येथे शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या हस्ते वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. सकाळी दहा वाजता सुरु होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये शेकाप राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, सुधाकर पाटील, शेतकरी नेते राजाराम पाटील, डॉ. पराग पाटील आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. त्यानंतर स्मारकाला अभिवादन, मानवंदना आणि पुष्पचक्र अर्पण करण्यात येणार आहे. राजन पांचाळ यांच्यामार्फत पीएनपी कला पथकाद्वारे सादरीकरण केले जाणार आहे. यावेळी चरीच्या संपाचा इतिहास कला पथकामार्फत सांगितला जाणार आहे. दुपारी दोन ते सायंकाळी पाच यावेळेत बक्षीस वितरण समारंभ, शेतकरी अवजारे वाटप आणि विद्यार्थ्यांना सायकल वितरण केले जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
चरीमध्ये ऐतिहासिक संपाचा उलगडणार इतिहास

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606