वाचनप्रेमी महिलेमुळे घर सुसंस्कृत

। सिंधुदुर्ग । प्रतिनिधी ।

घरातील महिलेने वाचन केले, तर संपूर्ण घरातील सदस्य वाचन संस्कृतीचे भाग बनतात. घरातील मुले सुसंस्कृत बनतात, असे उद्गार ‘वाचन संस्कृती आणि आजची महिला’ यावर उपस्थितांना मार्गदर्शन करताना स्वाती वालावलकर यांनी काढले.

वेतोरे येथील श्री देवी सातेरी वाचनालयाच्या वतीने आयोजित महिला सन्मान सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. यावेळी सुजाता चमणकर व अनिता वेतूरकर यांना वाचनालयाचा जीवन गौरव पुरस्काराने, तर कांचन गावडे व पूजा धुरी यांना श्री कर्तुत्ववान महिला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या सन्मान सोहळ्यात सुजाता चमणकर, अनिता वेतूरकर यांना ‘श्री देवी सातेरी वाचनालय जीवन गौरव पुरस्कार 2024’ प्रदान करण्यात आला. तसेच, आदर्श बालवाडी पुरस्कार प्राप्त कांचन दामले व संपूर्ण महाराष्ट्रामधून दिव्यांग विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांक प्राप्त करणार्‍या पूजा धुरी यांना कर्तृत्ववान महिला पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Exit mobile version