ऑक्टोबरमध्ये उन्हाचा तडाखा वाढला

तहान भागविण्यासाठी शीतपेयांचा आधार

| म्हसळा | प्रतिनिधी |

ऑक्टोबर महिन्यात उन्हाळ्याप्रमाणे तापमानात वाढ होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दिवसभर जाणवणारा उष्णतेचा तडाखा आणि घामाच्या धारांमुळे नागरिकांना वारंवार तहान लागत असून, तहान भागविण्यासाठी फळांचे रस, उसाचा रस, थंड पेये, लिंबूपाणी तसेच दही-ताक यांसारख्या शीतपेयांकडे नागरिकांचा कल वाढला आहे.

म्हसळा शहरातील फळविक्रेते आणि रसवंतिगृहांकडे नागरिकांची वर्दळ वाढताना दिसत आहे. साधारणपणे पावसाळा संपल्यानंतर वातावरणात गारवा जाणवण्याची अपेक्षा असते. मात्र, यंदा ऑक्टोबर महिन्यात उन्हाचा कडाका कायम असल्याने नागरिकांना उन्हाळ्याची तीव्रता जाणवत आहे. दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता अधिक जाणवत असल्यामुळे बाजारपेठेत कामानिमित्त बाहेर पडणारे नागरिक, व्यापारी, प्रवासी तसेच दुचाकीस्वार थंड पेये घेऊन तहान भागविताना दिसत आहेत. शहरातील फळांच्या दुकानांमध्ये सफरचंद, अननस, मोसंबी, संत्री, डाळिंब, चिकू केळ, ड्रॅगन फ्रुट यांसारख्या फळांचे रस तसेच उसाचा रस, लिंबूपाणी आणि इतर थंड पेयांना मागणी वाढत आहे. त्याचबरोबर शरीराला थंडावा मिळावा म्हणून दही-ताक पिण्याकडेही अनेकांचा कल आहे. उन्हाच्या झळांपासून काही काळ दिलासा मिळावा या उद्देशाने नागरिक शीतपेयांचा आधार घेत आहेत. त्यामुळे फळविक्रेते आणि रसवंतीगृहांमध्ये ग्राहकांची ये-जा वाढल्यासोबत फोटो आहे

Exit mobile version