जासई नाक्यावर पुलाचा लोखंडी गर्डर कोसळला; पहा व्हिडीओ!

1 कामगार ठार, 6 जण गंभीर
जेएनपीटी | अनंत नारंगीकर |
उरण तालुक्यातील जासई नाक्याजवळील उड्डाण पूलाचा लोखंडी गर्डर कोसळण्याची घटना मंगळवारी( 2 नोव्हेंबर) सायंकाळी 4-15 च्या सुमारास घडली.या घटनेत 13 कामगार दबले गेले,त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.त्यातील 1 कामगार दगावला असून 6 कामगारांची प्रकृती चिंताजनक आहे.
तालुक्यातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी जेएनपीटी,सिडको, आणि शासनाच्या माध्यमातून सध्या जासई नाक्यावर जे.कुमार कंपनीच्या देखरेखीखाली उड्डाणपुलाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मंगळवारी सायंकाळी पुलाचा लोखंडी गर्डर कोसळला.
जखमी कामगारांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात जे.कुमार कंपनीच्या निष्काळजीपणा मुळे झाला आहे.तसेच हा अपघातात वर्दळीच्या ठिकाणी झाल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. पघाताची सखोल चौकशी करून,दोषी ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.या अपघाता संदर्भात जे कुमार कंपनी व पोलीस यंत्रणेला विचारणा केली असता त्यांनी बोलण्यास नकार दर्शविला आहे.

Exit mobile version