साळाव-मुरूड रस्त्यावरील प्रवास खडतर

| कोर्लई | प्रतिनिधी |

राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळातर्फे साळाव-मुरुड रस्त्यावरील काँक्रिटिकरणात रस्त्यावरील दोन्ही बाजूंनी खोदाई करण्यात आली आहे. या खोदाईमुळे आणि महिनोमहिने काही ठिकाणी अपूर्ण ठेवलेल्या कामांमुळे वाहनचालकांसह प्रवासी वर्गाची डोकेदुखी वाढली आहे. आता दीपावलीच्या सणाला सुरुवात झाली असून, पर्यटनाचा नवा हंगाम देखील सुरू झाला आहे. त्यामुळे मुंबई, पुणेसह अन्य ठिकाणाहून पर्यटक साळाव-मुरूड मार्गे जंजिरा किल्ला व काशीद समुद्रकिनाऱ्यावर दाखल होत आहेत. मात्र, या रस्त्याच्या काँक्रिटिकरणात काशिद रस्त्यावरील यू टर्न, काशिद, चिकणी, सर्वे, दांडा, नांदगाव, आयुष हॉस्पिटल, मजगांव, विहूर भागात दोन्ही बाजूंना सुरू असलेली खोदाई आणि काही ठिकाणी पसरलेल्या खडीमुळे पर्यटकांसह स्थानिकांचा प्रवास खडतर झाला आहे. वेळप्रसंगी अपघाताला सामोरे जावे लागण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे. त्यामुळे राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळ संबंधित अधिकारी व प्रशासन तसेच आपत्ती व्यवस्थापनाने याची दखल घेऊन योग्य ती काळजी घ्यावी, अशी मागणी वाहनचालकांसह प्रवासीवर्ग व ग्रामस्थांतून केली जात आहे.

Exit mobile version