। पेण । प्रतिनिधी ।
जीवनातील वेगवेगळ्या टप्प्यात स्वःनिर्मितीचा आनंद हा जेवढा आनंददायक असतो तेवढाच जगण्याच्या पध्दतीला आयाम देणारा असतो. असे उद्गगार जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते ङॉ.वैशाली पाटील यांनी काढले त्या गार्गी फाऊंडेशन या संस्थेमार्फत आयोजित वारली कला कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या या प्रसंगी दृकश्राव्य कम्युनिकेशन डिझायनर कविता निधी ठाकूर उपस्थित होत्या.
करोनाच्या दोन वर्षांपासून सुटका झाल्यानंतर सुटीचा आनंद घेऊ इच्छिणार्या युवक वर्गातील स्वयंमसेवकां करीता गार्गी फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेमार्फत एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.पर्यावरण आठवड्याचे अभियानाचा हा एक भाग होता. या कार्यशाळेत जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मध्ये प्रशिक्षण घेतलेल्या कविता निधी ठाकुर यांनी अंकुर ट्रस्ट, चाईल्ड हेवन या संस्थेच्या मुलांना व कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष हातात ब्रश देऊन संस्थेमार्फत नुकत्याच आंबेघर, पेण येथील वास्तू मधील कंपाऊंड भिंतीवर वारली चित्र काढुन रंगवायला शिकविले. पेण खोपोली रोडवरील निसर्ग सौंदर्य व पावसाळी वातावरणातील हवेचा आनंद घेत लहान मोठ्यानी आनंद घेतला. या मध्ये गार्गी पाटील, श्वेता देसाई, गौरी दळवी, मिनल सांडे यांनी सहभाग घेतला. या कार्यशाळेत प्रकाश पाटील यांच्यासह सक्रिय सहभाग घेतलेल्या निराधार मुलांमधील सिद्धु सपकाळ आणि ज्ञानेश्वर चौधरी यांनी या प्रकारचे शिक्षण त्यांना भावी आयुष्यात उदरनिर्वाह करण्यास मदत करेल या बाबत विश्वास व्यक्त केला. या वेळेस डॉ. वैशाली पाटील यांनी स्वतः वेळ काढून वारली पेंटिंग करून कलेचा आनंद लुटत दिवस घालविला.