। रेवदंडा । प्रतिनिधी ।
रेवदंडा जेष्ठ नागरीक परिवाराचे सदस्याने विशेष मासिक सभेच्या निमित्ताने रेवदंडा विरंगुळा केंद्रात एकत्रित येऊन संगीतमय सुरसंगित मैफिलीचा आनंद लुटला. कोरोना संसर्ग रोगाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेले पहिल्याच कार्यक्रमांस मोठी उपस्थिती लाभली.
या विशेष सभेसाठी शेकापक्षाच्या महिला आघाडी प्रमुख व पीएनपी हायस्कुल कार्यवाहक चित्रलेखा पाटील यांच्या संकल्पनेतून विक्रात वार्डे यांच्या संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास रेवदंडा जेष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमांत विक्रात वार्डे आणि सहकार्याने सादर केलेले विविध संगितमय गितांनी जेष्ठ नागरिक मत्रंमुग्ध झाले, जेष्ठांनी विक्रांत वार्डे आणि सहकार्याना प्रोत्साहन देत, संगित कार्यक्रमाचा गोडवा वाढविला. संघाचे वतीने चित्रलेखा पाटील व विक्रांत वार्डे यांचे आभार व्यक्त केले.ज्येष्ठांच्या या विशेष मासिक सभेतील संगितमय कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जेष्ठांचे अध्यक्ष सुभाष चिटणीस, लता चिटणीस, देवधर, सरोज वरसोलकर, शरद वरसोलकर आदीने विशेष परिश्रम घेतले.