सांगवीमध्ये धडाडणार आघाडीच्या तोफा

| पनवेल | प्रतिनिधी |

एका जगविख्यात विचारवंताने एक अजरामर वाक्य लिहून ठेवले आहे. तुम्ही एखाद्याची मालमत्ता चोरू शकता पण त्याचे मालमत्ता कमावण्याचे हुनर तुम्हाला कदापिही चोरता येत नाही. हे वाक्य महायुतीमधील महाचोरांना चपखल बसते. असाच घणाघात 8 मे रोजी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर ऐकायला मिळणार आहे. 33 मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे लोकप्रिय अधिकृत उमेदवार संजोग भिकू वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची महासभा आयोजित करण्यात आली आहे.

बुधवार, दि. 8 मे रोजी सायंकाळी सहा वाजता महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी, सीपीआय (एम), आरपीआय (ए), स्वाभिमानी रिपब्लिकन युथ पार्टी, स्वराज इंडिया असे महाविकास आघाडी मधील घटक पक्षांचे नेते या महासभेमध्ये आपले विचार मांडणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह, आरपीआय (ए) चे दीपक भाऊ निकाळजे या वक्त्यांचे विचारवैभव उपस्थित श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहे.

Exit mobile version