दांडवाडीत मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा

| पाली/गोमाशी । वार्ताहर ।
जय श्री राम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा व श्री राम जन्मोत्सव सोहळा जय श्री राम आदिवासी ग्रामस्थ मंडळ दांडवाडी नांदगाव येथे 28 ते 31 मार्च दरम्यान संपन्न झाला. या सोहळ्यानिमित्त मूर्तीची मिरवणूक, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन, काकडा, पालखी सोहळा, सोंगी भारुड अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमासाठी मा.जि. प सदस्य सुरेश खैरे, राजेश मपारा, किशोर बुरुमकर, नरेश बुरुमकर, अरविंद फणसे, आदी मान्यवर ग्रामस्थ मंडळ तसेच शेजारील गावातील ग्रामस्थांनी श्री राम नवमी जन्मोत्सव सोहळ्या निमित्त भाविकांनी दर्शनासाठी उपस्थित होते.

Exit mobile version