| तळा | प्रतिनिधी |
भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असल्याने तिरंगी झेंडे, सदरे, रिबीन, बिल्ले, तिरंगा रांगोळी, तिरंगी पताका अशा विविध देशभक्तीच्या साहित्यांनी तळा बाजारपेठ सजली आहे. पूर्वी ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय आशा विविध शासकीय कार्यालयांमध्येच राष्ट्रध्वज फडकविण्याची परवानगी होती. मात्र गेल्या बारा वर्षांपासून सर्वत्र राष्ट्रध्वज फडकविण्याची परवानगी देण्यात आल्याने प्रजासत्ताक दिनी शर्टवर लावण्यासाठी, गाडीवर लावण्यासाठी लहान मुलांना रॅलीमध्ये हातात धरण्यासाठी हे साहित्य लागत असल्याने या देशभक्तीच्या साहित्यांना बाजारपेठेत मागणी वाढली आहे. तळा बाजारपेठेत चार दिवस आधीपासूनच हे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध झाल्याने नागरिकांकडून ते खरेदी करण्यासाठी गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
देशभक्तीच्या साहित्यांनी बाजारपेठ सजली
