डीपीडीसीची बैठक 30 जुलैला होणार

| रायगड | खास प्रतिनिधी |
जिल्हा नियोजन समितीची बैठक रविवारी 30 जुलै रोजी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शिंदे-फडणवीस यांच्या सत्तेमध्ये सहभागी झाल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ माजली होती. या कालावधीत सोमवारी 3 जुलै रोजी नियोजन समितीची बोलावण्यात आलेली बैठक रद्द करण्यात आली होती.

उदय सामंत हे रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. शनिवारी रत्नागिरी जिल्ह्यातील नियोजन समितीची बैठक पार पडणार आहे. त्यानंतर रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे. रायगड जिल्ह्याचा नियोजन विकास आराखडा हा तब्बल 360 कोटी रुपयांचा आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध विकास कामे करण्यात येतात.

बैठकीमध्ये 360 कोटी रुपयांच्या विकासकामांनबाबत बैठकीत कामकाज होणार आहे. तसेच विकास कामांचा आढावा घेण्यात येणार आहे. मागील इतिवृत्ताला मंजुरी देण्याचे काम देखील बैठकीत पार पडणार आहे. जिल्हा नियोजन समितीवर सुरुवातीला 11 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता नियोजनाचे ज्ञान असणारे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) उमा मुंढे आणि हनुमंत पिंगळे यांची निवड करण्यात आली आहे. विधीमंडळ सदस्यांमधून अद्याप दोन सदस्यांची नेमणूक होणे बाकी आहे.

Exit mobile version