दापोलीचा पारा घसरला

| दापोली | प्रतिनिधी |

मिनी महाबळेश्‍वर अशी ओळख असलेल्या दापोलीचा पारा 8.8 इतका घसरला आहे. वाढत्या थंडीने पर्यटन क्षेत्रातील पर्यटक सुखावले असून, दापोलीतील ही थंडी पर्यटकांना पर्यटन क्षेत्रात येण्यासाठी खुणावू लागली आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, उत्तरेकडून येणार्‍या शीतलहरींमुळे संपूर्ण राज्यात थंडीचे परिणाम दिसून येत आहेत. ऑक्टोबर हिटमुळे उष्ण तापमानात वाढ झाली होती, तर नोव्हेंबर महिन्यात थंडीची चाहूल जाणवू लागली आहे. 25 नोव्हेंबरपासून दापोलीत तापमानात घसरण होऊ लागली आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात दिवसागणिक थंडीचा कडाका वाढू लागला आहे. यावर्षी तापमान आणखीन खाली येत आहे. या वर्षीच्या निच्चांकी तापमानाची नोंद 8.8 अंश इतकी दापोलीत झाली आहे तर आणखी थंडी दापोलीत जाणवेल, असा अंदाज हवामान विभाग वर्तवत आहे.

Exit mobile version