हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला; अवकाळी पावसाला सुरुवात

| मुंबई | प्रतिनिधी |

येत्या ८ मार्चपर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांत ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाची शक्यता वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार होळीच्या दिवशी मुंबईतील काही भागांत रात्री १२ च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली.

हवामान विभागाने चार दिवस पावसाचा अंदाज दिला होता. हा अंदाज खरा ठरला आहे. वीजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे नुकसान होणार आहे.

हवामान विभागाने राज्यात ७२ तासांत अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज दिला होता. त्यानुसार राज्यातील काही भागात पाऊस झाला.

Exit mobile version