| मुंबई | वृत्तसंस्था |
भारतीय हवामान खात्याने पुढील पाच दिवस काही ठिकाणी हलका पाऊस, तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरु राहण्याची शक्यता वर्तवली आहे. यामध्ये कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस सुरू राहण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे. सध्या राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागली असता अशा अवकाळी पावसाने आता शेतकर्यांची चिंता वाढणार आहे. यासंदर्भात भारतीय हवामान खात्याने अंदाज वर्तवला असून, याविषयी ट्वीटर अकाऊंटवरुन माहिती दिली.