मिक्सरची कंटेनरला धडक

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल तालुक्यातील शिरढोण गावाच्या हद्दीत सिमेंट मिक्सर आणि कंटेनरच्या विचित्र अपघात झाला आहे. या धडकेत दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे मात्र सुदैवाने जीवितनाही झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मुंबई गोवा महामार्गावर चालू असलेल्या काँक्रेटीकरणामुळे काही ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे. याच पद्धतीने शिरढोण गावाच्या हद्दीत एकेरी वाहतुक असलेल्या साई प्रोव्हीसो काउंटी सोसायटीच्या समोर पेणहुन पनवेलकडे जेएसडब्ल्यू जाणार्‍या सिमेंट मिक्सरने समोरून येणार्‍या कंटेनरला धडक दिली. या धडकेत दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

Exit mobile version