। म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळा तालुक्यातील खारगाव बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच अनंत धर्मा नाक्ती हे लोकहिताचे काम करीत नसल्याने तसेच सदस्य व उपसरपंच यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करीत असल्याचे कारण पुढे करून उपसरपंच अकमल कादिरी यांचे नेतृत्वाखाली म्हसळा तहसिलदार समीर घारे यांचेकडे ग्राम पंचायतीचे पाच सदस्यांनी सहीनिशी लेखी तक्रार केली होती. त्या नुसार तहसिलदार यांनी मंगळवार दिनांक 21 जून रोजी ग्राम पंचायत कार्यालयात सकाळी 11.00 वाजता विशेष सभा आयोजित केली. ग्राम पंचायत सुधारित अधिनियमा नुसार अविश्वास प्रस्ताव मंजुर होण्यासाठी एकत्रितीयांश सदस्य संख्या आवश्यक असते. उपसरपंच अकमल कादिरी यांचे कडे ती पाच होती. एक सदस्य संख्या कमी असल्याने 5 विरूद्ध 3 ने सरपंच अनंत नाक्ती यांचेवर टाकण्यात आलेला प्रस्ताव फेटाळण्यात आला. सरपंच अनंत नाक्ती यांचे वरील अविश्वास ठराव रद्द करण्यात आला. त्यांचे डॉ.मोहिज शेख, सुरेश कुडेकर, जहुर हुर्जुक, संतोष जाधव आणि पदाधिकार्यांनी स्वागत केले.