मोटारसायकलची स्कुटीला टक्कर, दोघेही मोटारसायकल स्वार जखमी

राजमळा येथील घटना
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
भरधाव मोटारसायकल अचानक उजव्या बाजूला वळवत स्कुटीला टक्कर दिल्याने अपघात झाला. यात मोटारसायकल स्वार आणि स्कुटी चालक महिला हे दोघेही जखमी झाले. तसेच दोन्ही गाडयाचेही नुकसान झाले आहे. हा अपघात अलिबाग तालुक्यातील राजमळा बस स्टॅड येथे रविवार दिनांक 25 जुलै रोजी घडला.
अलिबाग पोलीस ठाणे हद्दीतील मोटारसायकल स्वार रा.वाघोली ता.अलिबाग याने त्याचे ताब्यातील मोटार सायकल राजमाळा बस स्टॅड येथे रस्त्याचे परिस्थीतीकडे दुर्लक्ष करुन अविचाराने व निष्काळजीपणे रोडचे उजवे साइटला अचानक व चुकिच्या पदधतीने वळवुन मारुन रेवस बाजुकडुन येणारी स्कुटीला रस्त्याच्या मध्यभागी ठोकर मारुन अपघात करुन अपघातात फिर्यादी रा.नवेदर नवगाव ता.अलिबाग याचे किरकोळ दुखापतीस व स्व:ताचे लहान मोठया दुखापतीस व दोन्ही वाहनाचे नुकसानीस कारणीभुत झाला.
याबाबत अलिबाग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सहायक फौजदार शेंबडे करीत आहेत.

Exit mobile version