71 जणांच्या संपत्तीत 286 टक्के वाढ
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
2009 ते 2019 या काळात सलग तीन वेळा खासदार झालेल्या 71 नेत्यांच्या संपत्तीमध्ये सरासरी 286 वाढ झाली आहे. भाजप खासदार रमेश चंदप्पा जिगाजिनागी यांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ झाली आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर)रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. या अहवालासनुसार ज्या दहा खासदारांची संपत्ती सर्वाधिक वाढली त्यामध्ये भाजपच्या सहा खासदारांचा समावेश आहे. तर शिरोमणी अकाली दल, राष्ट्रवादी काँग्रेस, बीजू जनता दल च्या एका समावेश आहे.
अपक्ष खासदारांसह 71 खासदारांची 2009 मध्ये सरासरी संपत्ती 6.15 कोटी रुपये इतकी होती. 2019 मध्ये यामध्ये 286 टक्क्यांनी वाढ झाली असून त्यांची सरासरी संपत्ती 17.59 कोटी रुपये झाली आहे. दरम्यान, मागील दहा वर्षात भाजपच्या खासदारांच्या संपत्तीमध्ये सरासरी 42 पटीनं वाढ झाल्याचेही रिपोर्ट्समध्ये म्हटलेय.
सुप्रिया सुळेची संपत्ती टक्क्यांची वाढ –
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीमध्ये 173 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2009 मध्ये सुप्रिया सुळे यांची संपत्ती 51.53 कोटी रुपये इतकी होती. 2019 मध्ये 173 टक्क्यांंनी वाढून 140.88 कोटी रुपये इतकी झाली. दहा वर्षात सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीमध्ये 89.35 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
बदरूद्दीन अजमल यांच्या संपत्तीमध्ये 160 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अकाली दलच्या खासदार हरसिमरत कौर बादल यांच्या संपत्तीत 261 टक्क्यांनी वाढ झाल्याचं रिपोर्ट्समधून समोर आले आहे. वरुण गांधींच्या संपत्ती 5 कोटींवरुन 60 कोटी झाली 2009 मध्ये मेनका गांधी यांची संपत्ती 17 कोटी रुपये होती, जी 2019 मध्ये 55 कोटी रुपये झाली. लागोपाठ तीन वेळा खासदार झालेल्या नेत्यांमध्ये भाजपच्या सर्वाधिक नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये भाजपचे 43 खासदार आहे. दहा वर्षात भाजपच्या या खासदारांची संपत्ती सरासरी 15 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 2009 मध्ये त्यांचं सरासरी उत्पन्न चार कोटी होतं. जे 2019 मध्ये 20 कोटी रुपये इतकं झालं आहे.
काँग्रेसच्या दहा संपत्ती सरासरी 10 कोटी रुपयांनी वाढली आहे. 2009 मध्ये काँग्रेसच्या खासरांची सरासरी संपत्ती पाच कोटी रुपये होती.. जी 2019 मध्ये 16 कोटी रुपये इतकी झाली आहे. तृणमृल काँग्रेस या पक्षाचा तिसरा क्रमांक लागतो… 71 पैकी तृणमृल काँग्रेसचे सात खासदार आहेत. 2009 मध्ये तृणमूल काँग्रेसच्या खासदारांची सरासरी संपत्त 76 लाख होती. जी 2019 मध्ये 5.9 कोटी रुपये इतकी झाली आहे. शिवसेना आणि बीजद यांचे प्रत्येकी दोन दोन खासदार आहेत.